Shiv Sena BJP alliance | युती न झाल्यास स्वबळासाठी नारायण राणे, छगन भुजबळ अस्त्र राखीव? | ABP Majha
Continues below advertisement
युती झाली तर ठिक अथवा दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरु केली आहे. त्यात अनेक माजी मंत्री, नेते शिवसेना भाजपमध्ये दाखल झाले आहेत आता दोन्ही पक्षांनी आपले हुकमी एक्के लपवून ठेवले आहेत. नारायण राणे आणि भुजबळांचा प्रवेश का लांबणीवर पडलाय याचं कारण युती आहे दोन्ही पक्षानी स्बबळावर निवडणुक लढण्यासाठी दोघांना राखून ठेवल्याचं समजतंय नारायण राणेंना भाजपने घेतलं तर शिवसेनेला पटणार नाही त्यामुळेच भाजपच्या काळात ज्या भुजबळांवर कारवाई झाली त्यांना शिवसेनेत घेतलं तर भाजपला पटणार नाही म्हणून दोन्ही पक्षांनी राणे-भुजबळ अस्त्र राखून ठेवलं आहे युतीत राणे-भुजबळ आल्यानं तणाव निर्माण होऊ शकतो पण युती झाली नाही तर राणे -भुजबळांना घेऊन दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं कळतं.स्वबळावर राणेंना घेऊन लढल्यास कोकणात किमान चार जागा भाजप जिंकू शकते तर भुजबळांसोबत लढल्यास शिवसेनालाही चार जागा जिंकतां येऊ शकतात असा सर्व्हे रिपोर्ट आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या रोजच्या स्वबळासाठी बैठका पाहता युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत
Continues below advertisement