#MeToo : महिला आयोगाच्या नोटीसला नानांचं तीन पानी उत्तर | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
#MeToo वादात अडकलेले अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी (16 नोव्हेंबर) राज्य महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर दिलं आहे. तीन पानांच्या या उत्तरात नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. "या प्रकरणाची पोलिसात नोंद झाली असून ते तपास करत आहेत. या प्रकरणी मी यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही," असंही नाना पाटेकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
Continues below advertisement