
मुंबई : जागतिक हास्य दिन, नाना-नानी पार्कमध्ये विशेष कार्यक्रम
Continues below advertisement
जागतिक हास्य दिन सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यानिमीत्त मुंबईतल्या नाना नानी पार्कमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात लाफ्टर क्लबमधल्या तब्बल २५० जणांनी सहभाग घेतला. सगळ्यांनी एकत्र येत आज हसण्याचा मनमुराद आनंद लुटला. किशोर कुवावाला यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.तसच ऑर्केस्ट्राच्या तालावर नाचण्याचा आनंदही प्रत्येकाने लुटला. यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे सहभागी झाले होते. यावेळी हसण्याने आरोग्याला काय काय फायदे होतात तेही सांगण्यात आलं.
Continues below advertisement