नागपूर : विविध विभागांतील 36 हजार पदांसाठी या महिन्यातच जाहिरात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2018 04:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत. 31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.