Flood Help | बकरी ईदच्या खर्चात काटकसर करत मुस्लिम बांधवांची पूरग्रस्तांना मदत | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
बकरी ईदच्या प्रयत्नपूर्वक खर्चात काटकसर करु, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना अवश्य मदत करु, असा निश्चय मुंबई सेंट्रलच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. मुंबईच्या सेंट्रलच्या ऑर्किड टॉवरमध्ये बकरी ईदची लगबग सुरु आहे. बकरी ईदनिमित्त एरवी महागात महान बकऱ्याची कुर्बानी देऊन मोठी दावत करायची परंपरा आहे. पण यंदा त्या खर्चाला आवर घालून, तो निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय ऑर्किड टॉवरच्या रहिवाशांनी घेतला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram