मुंबई : मुंलुंडमधील कंटेनर यार्डमध्ये आढळला अजगर
Continues below advertisement
मुलुंड आणि नाहूर मधील कंटेनर यार्डमध्ये आज संद्याकाळी सर्पमित्रांनी साडे नऊ फुटाच्या अजगराला जीवनदान दिलय. हा अजगर रस्ता ओलंडण्याच्या प्रयत्नात होता. त्या वेळी तिथून जाणाऱ्या एका प्रवाशाने सेव्ह वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन च्या सदस्यांना याची माहिती दिली. या माहितीच्या आधारावर संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन अजगराचा शोध घेत त्याला वाचवलं. हा अजगर इंडियन रॉक पायथॉन या प्रजातीचा असून त्याची लांबी साडेनऊ फुटाची आहे. मुलुंड परिसरात वारंवार जंगली प्राणी , आणि साप आढळून येत असल्याने इथल्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
Continues below advertisement