मुंबई : एमपीएससी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुलुंडमध्ये रोखला, आंदोलकांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
एमपीएससी आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात पुण्याहून मुंबईला निघालेला विद्यार्थ्यांचा लाँगमार्च काल मुंबई पोलिसांनी मुलुंड टोलनाक्यावर रोखला. यावेळी पोलिसांनी 40 ते 50 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. विविध मागण्यांसाठी 19 मे रोजी हा लाँगमार्च पुण्याहून निघाला होता. काल रात्री हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार होता. यानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिले जाणार होते. मात्र त्यापुर्वीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. दरम्यान, आज पुन्हा आंदोलक विद्यार्थी आझाद मैदानावर जमणार आहेत.
Continues below advertisement