मुंबई : अभिनेते मुकेश खन्नांचा चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
Continues below advertisement
चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीच्या चेअरमन पदाचा ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी राजीनामा दिला आहे. लहान मुलं देशाचं भविष्य आहे, त्यांना काय दाखवलं पाहिजे याकडं लक्ष देण्याची गरज आहे, मात्र अनेकदा सांगूनही लहान मुलांच्या चित्रपटांकडं लक्ष दिलं जात नाही. असा आरोप मुकेश खन्ना यांनी केला आहे. या बाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली.. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र लिहलं. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची दखल घेतली गेली नाही. यानंतर या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं खन्ना यांनी सांगितलं. शिवाय या पत्रकार परिषदेत खन्ना यांनी बाल विकास मंत्रालयावरही कडव्या शब्दात टीका केली.
Continues below advertisement