मुंबई : मध्य रेल्वेवर अनेक ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलं
Continues below advertisement
मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशनवर मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचलंय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत. सध्या मुंबई उपनगरांसोबत ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.
Continues below advertisement