
मुंबई : धावती लोकल पकडताना उदयोन्मुख कलाकार प्रफुल्ल भालेरावचा मृत्यू
Continues below advertisement
धावत्या लोकमध्ये चढू नका असं हजारदा सांगितलं जातं. मात्र, ते न ऐकल्यानं आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. आणि हेच घडलं कुंकु या मालिकेतील उदयोन्मुख कलाकार प्रफुल्ल भालेराव याच्या बाबतीत. पहाटेच्या सुमारास प्रफुल्ल धावत्या लोकलमध्ये चढायला गेला. मात्र, नीट चढता न आल्यानं तो लोकलखाली गेला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे. मुंबईत मालाडजवळ प्रफुल्लला अपघात झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement