मुंबई: राज्यात मेडिकलच्या 100 जागा वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
यंदा राज्यात मेडिकलच्या 100 जागा वाढण्याची शक्यता आहे.. मेडिकलच्या जागा वाढवण्यासंबंधी डीएमईआर म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय यावर विचार करत आहे...जुलैच्या पहिल्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.. मात्र या 100 जागा राज्यातल्या कोणकोणत्या महाविद्यालयात वाढणार याबाबत स्पष्टता नाहीये.. नीट ही मेडिकल प्रवेश परीक्षा देणाऱ्यांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर असून त्या तुलनेत राज्यात मेडिकल प्रवेशाच्या एकूण फक्त 4 हजार 600 जागा आहेत...त्यामुळे या जागा वाढल्यास नक्कीच मेडिकल प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल...
Continues below advertisement