मुंबईत महिला सुरक्षित आहेत का?

Continues below advertisement
मुंबई लोकलच्या डब्यात महिलेला धक्काबुक्की झाली आहे. काल रात्री ११ वाजता ही महिला लोकलनं ठाण्याहून आपल्या मित्रासह सीएसएमटीच्या दिशेने जात होती. याच दरम्यान काही कारणाहून या दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्याचं रुपांतर भांडणात झालं. या मित्रानं रेल्वेच्या डब्यातच महिलेला धक्काबुक्की केली. विशेष म्हणजे हे भांडण सुरु असताना रेल्वेतल्या कोणत्याही  प्रवाशानं मध्यस्थी केली नाही. एवढंच काय तर शेजारच्या डब्यातला सुरक्षा रक्षकानंही हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. या सगळ्या प्रकरणानंतर दादर स्टेशनला या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला गेला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram