मुंबई : कमला मिल आगप्रकरणी मोजोज बिस्त्रो पबचा मालक युग तुलीला अटक
कमला मिल आगप्रकरणी अखेर मोजोज बिस्त्रो पबचा मालक युग तुलीला अटक करण्यात आली. 14 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या कमला मिल आगप्रकरणी युग तुली प्रमुख आरोपींपैकी एक होता.
मात्र गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्जही केला होता. पण तो अर्ज फेटाळल्यानंतर युग तुली गायब होता. अखेर त्याने काल रात्री ना म जोशी मार्ग पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शरण आलेल्या युग तुलीला पोलिसांनी अटक केली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल.