VIDEO | पुण्यात मोहन जोशी, ईशान्य मुंबईत कोण? | मुंबई | एबीपी माझा
पुण्यातल्या काँग्रेसची जागा अखेर मोहन जोशींना देण्यात आलीय, तर इकडे ईशान्य मुंबईतल्या भाजप उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. काल काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी मोहन जोशींचं नाव घोषित करण्यात आलं. पुणे लोकसभेच्या शर्यतीत काँग्रेसकडून मोहन जोशींसह प्रविण गायकवाड आणि अरविंद शिंदे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र अखेर काँग्रेसनं मोहन जोशींची निवड केली. तिकडे भाजपचा ईशान्य़ मुंबईचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं कळतंय..ईशान्य मुंबईचा उमेदवार काल जाहीर होईल असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलं होतं..मात्र अद्यापही हा तिढा सुटलेला नाही.