मुंबई | मॉडेलची मित्राकडून हत्या, अवघ्या तीन तासात आरोपी जेरबंद
मॉडेल मैत्रिणीची मित्रानेच हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली. धक्कादायक म्हणजे या आरोपीने मॉडेलचा मृतदेह बॅगेत भरुन मालाड परिसरात फेकला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत अवघ्या तीन तासात प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपीला जेरबंद केलं. त्याने या हत्येची कबुली दिली आहे