संताप मोर्चा : मनसेच्या मोर्चाला अभिनेते जितेंद्र जोशी यांचा पाठिंबा
एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आणि रेल्वेच्या विविध प्रश्नावर आज चर्चगेट येथे मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, अद्याप मनसेच्या या मोर्चाला पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. पोलिसांनी कागदोपत्री परवानगी दिली नसली तरी परवानगी नाकारलेलीही नाही.