मुंबई : काँग्रेस कार्यालयावर हल्लाप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे अटकेत
Continues below advertisement
काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मनसेच्या झेंड्याची आणि राज ठाकरेंच्या प्रतिमांची होळी केली. आज सकाळी सीएसटीजवळच्या काँग्रेस कार्यालयात मनसेचे कार्यकर्ते घुसले, आणि तोडफोड सुरु केली. दरम्यान या घटनेनंतर मनसेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे...मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन संजय निरुपमांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं म्हटलं. यानंतर संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Continues below advertisement