मुंबई : परप्रांतीय भटका कुत्रा, निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं होर्डिंग
Continues below advertisement
काँग्रेस विशेषत: संजय निरुपम आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळताना दिसत आहे. कारण मनसेनं काल काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्यानंतर, आज मध्यरात्री काही अज्ञातांनी वांद्रेमधील काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक केली. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेनं परप्रांतीय भटका कुत्रा असा उल्लेख असलेला भलामोठा फ्लेक्स उभारला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी खुद्द भाजपनंच फूस लावल्यानं मनसेनं हा राडा केल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement