मुंबई : MMRDA विरोधात रिलायन्सची कोर्टात धाव
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असणाऱ्या एमएमआरडीएविरोधात मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीनं न्यायालयात धाव घेतली आहे. अतिरिक्त प्रीमियम अदा न केल्यानं एमएमआरडीएनं रिलायन्ससहीत इतर सर्व थकबाकीदारांना अंतिम नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर रिलायन्सनं हे पाऊल उचललं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे. मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सी-६६ जमिनीचे रिलायन्स कंपनीने ७७० कोटी देणं होतं, परंतू रिलायन्सनं फक्त १०३ कोटी रुपये अदा केले. यानंतर एमएमआरडीएनं ही नोटीस धाडली होती. आता रिलायन्सच्या या पावलानंतर एमएमआरडीएनं रिलायन्सवर कायमस्वरुपी बंदी घालावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन केली आहे.
Continues below advertisement