मुंबई : मुख्यमंत्री बदलल्यास पाठिंबा काढू, रवी राणांसह सहा आमदारांचा इशारा
Continues below advertisement
मुख्यमंत्री बदलले तर भाजपचा पाठिंबा काढून घेऊ असा निर्धार राज्यातल्या सहा अपक्ष आमदारांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्यासाठी सक्षम आहेत, मात्र त्यांना पदावरुन दूर केलं तर आपण सरकारमध्ये राहणार नाही, असा इशारा अमरावतीच्या बडनेरातील अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. अपक्ष आमदारांमध्ये त्यांच्यासोबत गणपतराव गायकवाड, हिरालाल चौधरी, किशनराव जाधव, माधवराव फड यांचाही सहभाग असल्याचा राणा यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन चिघळत असल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आहे. काल संजय राऊत यांनी याबाबत दावा केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लॉबिंग सुरु झालं आहे. अर्थात शिवसेना आणि भाजपकडे पुरेसं संख्याबळ असल्यामुळे सहा आमदारांनी पाठिंबा काढला तरीही सरकारला फारसा धोका उद्भवत नाही.
Continues below advertisement