मुंबई : 100 रुपयांचा स्टिकर घ्या, आमदार व्हा, नितेश राणेंकडून प्रकार उघड
आमदारांच्या अधिकृत सरकारी वाहनांवर चिकटवण्यात येणाऱ्या स्टिकर्सची बाजारात खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उघडकीस आणला. विशेष म्हणजे अवघ्या शंभर रुपयांत हे स्टिकर मिळत असल्याचा दावाही राणे यांनी केला