मुंबई:मिथुन चक्रवर्तींच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला
Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह आणि पत्नी योगिता बाली यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिलाय. एका भोजपुरी अभिनेत्रीनं या दोघांवर वरील आरोपांखाली तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या रोहिणी न्यायालयाने त्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते.
Continues below advertisement