मुंबई: मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी 'मिशन साहसी'
Continues below advertisement
महिलांच्या सुरक्षेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं मिशन साहसी हा कार्यक्रम आयोजित केला होता. वांद्रे कुर्ल्यामधील मैदानात हा सगळा कार्यक्रम पार पडला. मुलींनी स्वतःचं रक्षण करावं यासाठी काही चित्तथराराक प्रात्यक्षिकं देखील सादर करण्यात आली. मुलींचं मनोबल वाढवून संकंटांचा सामना करण्यासाठी कश्याप्रकारे दोन हात करावे हे सुद्धा या कार्यक्रमात सांगण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजर होते. मुलींच्या रक्षणासाठी महाराष्टत्रातील सर्व मुलींना प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement