Milind Deora | मिलिंद देवरांचा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मजबूत करण्यासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन वरिष्ठ नेत्यांचं सामूहिक नेतृत्व असलेली समिती स्थापना करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. मुंबई काँग्रेसला योग्य दिशा देणे आणि संघटीत ठेवण्याचं काम करत राहणार असल्याचंही मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलं. मिलिंद देवरा यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रात काँग्रेससाठी भाजपा-शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावाचा सामना करणे हे काँग्रेससाठी एक मोठे आव्हान आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram