मुंबई : म्हाडाकडून लवकरच एक हजार घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात, निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी
हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना म्हाडानं मोठं गिफ्ट दिलंय. कारण लवकरच एक हजार घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं म्हाडानं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमती पाहता घराचं स्वप्न दुरापास्त होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे यंदा म्हाडाच्या लॉटरीत निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. यातील बहुतेक घरं ही मुलुंड आणि सायन प्रतीक्षानगर भागात असणार आहेत. विशेष म्हणजे लॉटरी सोहळ्याच्या खर्चात कपात करण्यासाठी वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात मंडप उभारुन लॉटरी योजना जाहीर करण्यात येणार आहे. त्याशिवाय फेसबुकवरही लॉटरीचं थेट प्रक्षेपण करणार असल्याचं म्हाडानं स्पष्ट केलंय.