मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 9018 घरांची लॉटरी, 18 जुलैपासून अर्ज भरा!
Continues below advertisement
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 18 जुलैपासून अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी दिली. सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील 1905, खोणी (ता. कल्याण ) येथील 2032 इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला, मात्र एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करु शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबीक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.
Continues below advertisement