मुंबई : मुंबईकरांना खुशखबर, ‘म्हाडा’च्या लॉटरीचा मुहूर्त ठरला!

Continues below advertisement

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना एका आनंदाची बातमी आहे. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा जाहिरात प्रसिद्ध करणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे. अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण एक हजार घरांसाठी ही जाहिरत असेल.  

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर, साधारण ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्यात येईल.

अत्यल्प उत्पन्न गटासाठी 800 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरे असतील, अशी माहिती मिळते आहे.

म्हाडाच्या या नव्या घरांच्या किंमती अद्याप ठरल्या नाहीत. यावर अंतिम निर्णयाची सध्या प्रक्रिया सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram