मुंबई : भारताला बुलेट ट्रेनची नाही, आधुनिक, सुरक्षित रेल्वेची गरज : ई श्रीधरन
Continues below advertisement
भारतातील लोकांना बुलेट ट्रेनपेक्षा स्वच्छ, सुरक्षित आणि जलद रेल्वेची गरज आहे, असं मत मेट्रोमॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे. बुलेट ट्रेन ही धनाढ्य लोकांची सवारी आहे, बुलेट ट्रेन सुरु झालेल्या देशांच्या तुलनेत भारत २० वर्षांनी मागे असल्याचंही श्रीधरन म्हणाले. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. मुंबई-अहमदाबाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या मार्गाला महाराष्ट्रातून राज ठाकरेंसह अनेकांचा विरोध आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक गावांनीही बुलेट ट्रेनसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाला विरोध केला आहे.
Continues below advertisement