Mumbai Metro 3 | मेट्रो 3 प्रकल्पाच्या भुयारीकरणाचा 13 वा टप्पा पूर्ण | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
कुलाबा ते सिप्झ या मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला. विधानभवन जवळील प्रस्तावित मेट्रो स्थानकाजवळ भुयारीकरणाचं काम पूर्ण झालंय. सकाऴी साडेनऊच्या सुमारास सूर्या - 2 हे टनेल बोअरिंग मशीन भुयारातून बाहेर आलं. कफपरेड मेट्रो स्थानक ते विधानभवन हे सव्वा किलोमीटरचं भुयारीकरण पूर्ण करण्यासाठी 205 दिवसांचा कालावधी लागला. या भुयारीकरणाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला अनेक वादांना तोंड द्यावं लागलं होतं. पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेवर एकूण 27 थांबे असणार आहेत. या प्रकल्पाच्या एकूण 52 किलोमीटर भुयारीकरणाच्या कामापैकी जवळपास 26.15 किलोमीटरचं काम पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Continues below advertisement