मुंबई : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी मेहुल चोकसीची 1270 कोटींची संपत्ती जप्त

Continues below advertisement
पंजाब नॅशनल बँकेला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून परदेशात फरार झालेल्या मेहुल चोकसीच्या मालमत्तांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या.

या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली.

डायमंड किंग नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी पीएनबी बँकेत कर्ज घोटाळा करुन परदेशात पोबारा केला आहे. मात्र सीबीआय आणि ईडीकडून या दोघांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरुच आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram