मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर शेवटची लोकल आज लवकर सुटणार!

Continues below advertisement
मुंबई : मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप-जलद मार्गावर रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 5.30 या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत हार्बर, मध्य रेल्वेवरील लोकल, मेल/एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

हार्बर मार्गावरील वडाळा ते मानखुर्द स्थानकांमध्ये दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. डाऊन हार्बरवर शनिवारी रात्री 10.58 ते रात्री 12.40 आणि पहाटे 4.32 ते 5.56 वाजेपर्यंत, अप हार्बरवर शनिवारी रात्री 9.59 ते रात्री 12.03 आणि पहाटे 3.51 ते 5.15 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल.

या कालावधीत पनवेल ते मानखुर्दमध्ये विशेष गाड्या चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाणे ते वाशी, नेरूळपर्यंत प्रवास करू शकतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram