मुंबई : पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द
मुंबईत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पावासाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र हार्बर मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार होता.