ब्रेकफास्ट न्यूज : लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्लो मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर बोरीवली ते गोरेगाव अप आणि जलद गतीमार्गावर सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपासून ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हार्बर मार्गावरच्या कुर्ला ते वाशीपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे मुंबईकरांनी लोकलचं हे वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचा प्लॅन करा.