मुंबई : अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेप
अभिनेत्री मीनाक्षी थापा हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमित जयस्वाल आणि प्रिती सुरीन यांना मुंबई सत्र न्यायालयाने तिहेरी जन्मठेप सुनावली असून ही शिक्षा एकत्रच भोगायची आहे. अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांनी अतिशय थंड डोक्याने 2012 मध्ये मीनाक्षीची निर्घृण हत्या केली होती.