मुंबई : 'त्या' दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
महापालिकेचे अधिकारी शेतकऱ्यांना शेतमाल विकू देत नाहीत. यामुळे काल उस्मानाबादमधील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल मंत्रालयासमोर फेकला. त्यानंतर आता महापालिकेला जाग आली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर शेतकऱ्यांना माल विकू देण्यास त्रास दिला असेल तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असं आश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलंय. ते आज एबीपी माझाशी बोलत होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करत शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला चक्क मुंबईतल्या मंत्रालयाच्या दारावर फेकून दिला होता.
Continues below advertisement