मुंबई : माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे, वापरासाठी बंदी
Continues below advertisement
अंधेरी पूल दुर्घटनेत एका महिलेनं जीव गमावल्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन खडबडून जागी झालेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माटुंगा रोड स्टेशनजवळच्या पादचारी पुलाला मोठा तडा गेला आहे. याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेने आणि रेल्वेने हा पादचारी पूल वापरासाठी बंद केला आहे. मात्र त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आता पूल लवकरात लवकर डागडुजी करुन वापरासाठी खुला कऱण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तरी, मुंबईतल्या अंधेरी पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील काही धोकादायक पादचारी पूल प्रवाशांच्या वापरासाठी बंद करण्यात आले आहेत.
Continues below advertisement