मुंबई : अंधेरीतील मरोळमध्ये इमारतीचे दोन मजले जळून खाक, चौघांचा मृत्यू
मुंबईतील कमला मिल आगीची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा आगीने चार जणांचा बळी घेतला आहे. अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे.