मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण
Continues below advertisement
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजारात चांगलीच मोठी घसरण झाली आहे...सेन्सेक्स तब्बल 505 अंकांनी तर निफ्टी 171 अंकांनी कोसळला आहे...तर तिकडं अमेरीकेच्या शेअर मार्केटमध्ये घसरणीचंच चित्र पाहायला मिळतंय...तिथं डाऊ जोन्स तब्बल 1033 अंकांनी कोसळला आहे...बजेटनंतर मुंबई शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती..त्यानंतर बाजार सावरलाही होता. मात्र आठवड्याच्या शेवट येता येता पुन्हा शेअर बाजार पडला आहे...
Continues below advertisement