
मुंबई : महाराजांच्या वंशजांनी हिरे विकण्याच्या दाव्याचा शाम जाजूंनी पुरावा द्यावा : विनोद पाटील
Continues below advertisement
शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. आणि मुंबईच्या बाजारपेठेत या हिऱ्याचा लिलाव करत असताना लिलाव थांबवून माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाऱ्याने भोसले कुटुंबियांना आर्थिक मदत केली. असा दावा भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी केलाय. औरंगाबादेत झालेल्या भाषणात ते बोलत होते.दरम्यान श्याम जाजू यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेध नोंदवण्यात आला आहे. जाजू यांनी वक्तव्याचे पुरावे द्यावेत अन्यथा भाजपाने जाजू यांच्या वक्तव्याचा खुलासा करावा असं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनोद पाटील यांनी म्हटलं आहे .
Continues below advertisement