मुंबई | मंत्रालयाच्या पायऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार
मंत्रालयाच्या मेकओव्हरमध्ये बनवण्यात आलेल्या पायऱ्या आता तोडण्यात येणार आहेत.. मुंबईच्या प्रसिद्ध अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांसारख्याच पायऱ्या मंत्रालयाच्या नव्या बिल्डींगबाहेर दिखाव्यापोटी बनवण्यात आल्या...मात्र, आता याच पायऱ्या मुंबई पोलिस दलाला सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अग्निशमन दलाला त्यांच्या ऑपरेशन्सच्या दृष्टीनं अडथळा वाटतायत.. 2012 साली लागलेल्या आगीनंतर मंत्रालयाच्या नव्या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं.. त्यासाठी जनतेच्या कररुपी मिळणाऱ्या पैशातून तब्बल 200 कोटीं रुपये खर्च झाले.. पण एवढा मोठा खर्च करुन या बांधलेल्या पायऱ्या पोलिसांच्या सुरक्षेला धोका ठरतायत.. देव न करो, पण पुन्हा 2012 साऱख्याच आगीच्या घटनेची मंत्रालय परिसरात पुनरावृत्ती झाली तर ते अग्निशमन दलालाही अडथळा ठरणार आहेत.