मुंबई : उंदीर घोटाळ्याला नवं वळण, अस्तित्त्वात नसलेल्या संस्थेला कंत्राट दिले
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर, याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. ज्या कंपनीला उंदीर मारण्याचं कंत्राट दिलं, ती कंपनीच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्त्वात नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे. ही संस्था केवळ कागदोपत्री आहे.