मुंबई : परळ स्थानकातील पादचारी पुलाचं आजचं काम पूर्ण, मध्य रेल्वेची वाहतूक सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तब्बल सहा तासांच्या मेगाब्लॉकनंतर सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकलसेवा धिम्या गतीनं सुरु झाली आहे. लष्कराकडून सुरु असलेल्या परळ स्थानकावरच्या पादचारी पुलाचं आजचं काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. याचबरोबर करीरोड इथल्याही पादचारी पुलाचं काम सुरु करण्यात येत आहे. आज रविवार असल्यानं प्रवाशी संख्या कमी होती. मात्र आता मेगाब्लॉक उशिरानं सुटल्यानं प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.