मुंबई : मानखुर्दमध्ये मंडाला झोपडपट्टीत अग्नितांडव
मुंबईत पुन्हा एकदा आग लागण्याची मोठी घटना समोर आली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भंगार गोदमांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि 10 वॉटर टँकर ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या गोदमांमध्ये प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक आणि ऑईल आहे. सुरुवातीला एका गोदमाला लागलेली आग पसरत गेली आणि 10 ते 12 गोदाम या आगीच्या कचाट्यात सापडले.
आगीवर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत, मात्र आग वाढतच आहे. हवेत सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. झोपडपट्टीपर्यंत आग पोहचू नाही म्हणून अग्निशमन दल प्रयत्न करत आहे