मुंबई : पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार सरी
Continues below advertisement
मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे.
Continues below advertisement