
Mumbai Rain Updates | मुसळधार पावसाने ‘मातोश्री’ जलमय, महापालिकेच्या कारभाराचे तीनतेरा | मुंबई | ABP Majha
मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाचा फटका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलानगर परिसराला बसला आहे. वांद्रेतील कलानगरमध्ये तुफान पाणी साचलं आहे. चक्क मातोश्रीचा परिसर जलमय झाल्याने महापालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वांद्र्यात जिथे राहतात तेथील कलानगर, सरकारी वसाहत, शास्री नगर, एमआयजी ग्राऊंड या सगळ्या भागात पाणी साचलं आहे. हा रस्ता पार करायला पाच मिनिटं लागतात तोच रस्ता आता पार करण्यासाठी तब्बल 20 ते 25 मिनिटं लागत आहेत.