मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर?
Continues below advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीला आता अवघं वर्ष उरलेलं असताना पक्षप्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.
महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर-पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेसकडून गुरुदास कामत यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी मांजरेकरांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीआधी आता मांजरेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतं आहे.
महेश मांजरेकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर राज ठाकरे यांची साथ सोडून काँग्रेसचा 'हात' धरण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अशोक चव्हाण यांना संपर्क साधला असता त्यांनी महेश मांजरेकर आले तर त्यांचं पक्षात स्वागत असेल. असं विधान एबीपी माझाशी बोलताना केलं.