KG & Class 1 Admission | केजी आणि इयत्ता पहिली प्रवेशाच्या वयोमर्यादेत कपात | ABP Majha

Continues below advertisement

आता केजी आणि इयत्ता पहिली शाळा प्रवेशासाठी मुलांच्या वयोमर्यादेत 15 दिवसांची शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. इयत्ता पहिलीसाठी 6 वर्ष तर प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष वयोमर्यादा होती.  मात्र आता ही वयोमर्यादा 15 दिवसांनी कमी केली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात इयत्ता पहिली प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत 6 वर्ष पूर्ण असावीत अशी अट होती. आणि एका दिवसाने जरी वय पूर्ण नसेल तर पाल्याला प्रवेश नाकारला जायचा. त्यामुळे विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष वाया जायचं. त्यामुळे आता आणखी 15 दिवसांची सूट देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram