हवाईजादा अमोल यादवचं विमान भरारीसाठी सज्ज, राज्य सरकारकडून पाहणी
Continues below advertisement
हवाईजादा अमोल यादवच्या विमानाची काल राज्य सरकारकडून पाहणी करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून अमोल सिक्स सीटर एअरक्राफ्टची निर्मीती करतोय. त्याचं विमान तयार झालं असून त्यासंदर्भातील विशेष तपासणी पार पडली. मात्र अद्याप त्याच्या विमानाची नोंदणी झालेली नाही. त्यामुळं एकीक़डे मेक इन महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचा नारा लावणाऱ्या सरकारनं मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. दरम्यान तपासणी अधिकारी कौस्तुभ धवस यांनी विमानाच्या नोंदणीसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासनही दिलं.
Continues below advertisement