महाराष्ट्र बंद: मुंबई: 13 बेस्ट बसेसची तोडफोड
Continues below advertisement
भीमा-कोरेगावातील हिंसाचारानंतर आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत.
सकाळी सात वाजेपासूनच रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांना घरातून बाहेर पडणं मुश्कील झालं.
तर जे बाहेर पडले, त्यांना आपल्या कार्यालयाच्या स्थळी पोहोचता आलं नाही.
त्यात सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोड दरम्यान मेट्रो बंद ठेवल्यानं मनस्तापात भर पडली.
रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी आधीच वाहतूक बंद ठेवल्यानं लोकांना प्रवासाचा दुसरा मार्ग सापडला नाही.
त्यातच ज्या बसेस रस्त्यावर उतरल्या त्यांची आंदोलकांनी तोडफोड केली. ज्यात 13 बसेसचं नुकसान झालं.
तर ट्रक आणि इतर वाहनांची टायरही जाळून टाकण्यात आली. ज्यामुळे वातावऱण तणावाचं झालं होतं..