मुंबई : आजपासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन
मुंबईत आजपासून महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. राज्यपाल सी विद्यासागरराव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी 13.30 वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर 17 जानेवारी ते 29 जानेवारी असे 13 दिवस हे प्रदर्शन सुरु राहणार असून प्रवेश विनामूल्य असेल.